परभणी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही

Parbhani News
Parbhani News
Updated on

परभणी : परभणी येथील जिल्हा रुग्णालयात ७४ रुग्णांची नोंद झाली असून एकुण घेण्यात आलेले स्वॅब ५७ व त्या पैकी ३१ निगेटिव्ह असुन १७ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. (नऊ स्वॅब रिजेक्टेड आहेत) त्यापैकी ४५ परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील व देशातंर्गत चार असे एकुण ४९ नागरिक निगरानीखाली आहेत. 
 
या ७४ नागरिकांपैकी १५ नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये तर उर्वरित ५९ नागरिक त्यांच्या घरी विलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी वैद्यकिय पथकामार्फत फेरतपासणी करण्यात आली आहे. या ५९ रुग्णांची प्रकृती स्थिर असून आज नवीन सात रुग्णांची जिल्हा रुग्णालयात नोंद झाली आहे. तसेच कोरोना बाहय रुग्ण विभागात १०५ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.  सोमवारी (ता. २३ मार्च २०२०) एकुण ११ रुग्णांचे नमुने (स्वॅब) तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्थेस पाठविण्यात आले आहेत. जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हयामध्ये कोरंन्टाईनसाठी ३२० खाटा व आयसोलेशनसाठी शासकीय व खाजगी असे एकुण २२५ खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

जिल्हयामध्ये कोरोना प्रतिबंधक मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुडेटकर, उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यंवशी, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्री. काटकर, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योत्स्ना  धुळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, महापालिका आयुक्त रमेश पवार, पोलिस उपअधिक्षक श्री. मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री. सरकटे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांना नोडल अधिकारी म्हणुन आदेशीत केले आहे. तसेच जिल्हयात मागील १५ दिवसात परदेशातुन आलेल्या नागरिकांविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रशासनास (०२४५२ -२२२५६०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  

जिल्हयात आज रोजी कोरोना विषाणु बाधीत एक ही रुग्ण सापडलेला नाही.  त्यामुळे नागरिकांनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवांवर विश्वास ठेवु नये., जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.